दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले सेवा फाउंडेशन; गरजूवंत मुलांच्या मेसचा खर्च भरणार; सवर्सामान्य जनतेलाही मदतीचे आवाहन

Foto

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता तर आणखीनच जास्त आहे. अशा परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेसचा खर्च भरणे परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी औरंगाबाद शहर सोडून आपल्या गावी जात आहेत. अशा गरजूवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आता सेवा फाउंडेशन ने पुढाकार घेतला असून ते शहरातील दुष्काळग्रस्त मुलांच्या मेसचा खर्च सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भरणार आहे असे सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या  माध्यमातून सांगितले आहे. 

सेवा फाऊंडेशनला आजरोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सेवा फाउंडेशनने साहभाग नोंदवला आहे. आज महाराष्ट्र भीषण दुष्काळ असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मेसचा खर्च परवडणारा नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी गावी जात आहेत. त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये.  हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सुमित खांबेकर यांनी दै.  सांजवार्ताशी बोलताना सांगितले. आतापर्यंत पन्नास ते साठ गरजूवंत विद्यार्थ्यांना सेवा फाउंडेशनने मदत केली असून दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्याचा मानस असल्याचे खांबेकर यांनी सांगितले आहे. तसेच सर्वसामान्य जनतेने देखील सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमात सहभागी होत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी  केले आहे. 

अशी करणार गरजू विद्यार्थ्यांना मदत  
सेवा फाऊंडेशनचे जवळपास अठराशे सदस्य आहेत. ते विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्याची खरी परिस्थती समजून घेतील. त्यांनंतरच विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च भरण्यात येईल. सेवा फाउंडेशनने  एक फॉर्म तयार केला असून त्यामध्ये विद्यार्थांची संपूर्ण माहिती भरण्यात येईल. यानंतर मेसच्या पैशाचा चेक थेट मेस मालकाला देण्यात येईल.